सदाभाऊ पुन्हा विधानपरिषेदचे आमदार ?
- भाजपाकडून पाच उमेदवार जाहीर
सांगली ! प्रतिनिधी
विधान परिषदेसाठी भाजपाने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या मध्ये सांगलीतून पुन्हा एकदा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची वर्णी लागली आहे.
युतीमध्ये भाजपाला पाच जागा सुटल्या होत्या. त्यामध्ये पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सदाभाऊ यांच्यासह पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, योगेश टिळेकर हे चार उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सदाभाऊ खोत पदापासून वंचित होते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये ही नैराश्य निर्माण झाले होते. त्यांना पुन्हा विधान परिषद मिळाल्याने त्यांचा गट राजकारणात सक्रिय होईल असे चित्र आहे.