विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सोबत समर्थक आमदारांची मुंबईत बैठक सुरू
– राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेही उपस्थित
– राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पद बदलाच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा
सांगली / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या समर्थक आमदारांची बैठक सुरू झाली आहे. मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थान येथे ही बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे, आ. धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, किरण लहामटे, दौलत दरोडा आदींसह आमदार उपस्थित आहेत.
गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष पद जयंत पाटील यांच्याकडे आहे. अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षाची जबाबदारी द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आजच्या होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद बदलाच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
—————————————
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज.
– मो. नं – 7350266067